गंगापूर दुय्यम निबंधक कार्यालयात अधिकारी झाले कर्मचारी, खाजगी माणूस बनला अधिकारी

Foto
गंगापूर, (प्रतिनिधी):  दुय्यम निबंधक कार्यालयात एजंटगिरीचा सुळसुळाट झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. पैशाशिवाय कामच होत नाही, असा आरोप सर्वसामान्य नागरिकांनी केला असून, या कार्यालयात खाजगी व्यक्तींचा प्रभाव प्रचंड वाढला आहे.

गंगापूर शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सरकारी कार्यालयात अधिकाराचा गैरवापर इतका झाला आहे की दुय्यम निबंधक अधिकारी स्वतःची खुर्ची रिकामी ठेवतात आणि एका खाजगी माणसाच्या शेजारी दुसरी खुर्ची लावून बसतात. आणि कामकाज चालते एजंटांच्या हातात. अधिकारी केवळ नावालाच उरले असून, सर्व कामकाज एजंट व खाजगी लोकांच्या इशाऱ्यावर चालत असल्याची चर्चा रंगली आहे.

या कार्यालयात अनेकदा वाद, भांडणे झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, इतक्या घटनांनंतरही कार्यालयात एकही सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आला नाही. त्यामुळे पारदर्शकतेचा पूर्ण अभाव असल्याचे नागरिक सांगतात. गंगापूरमधील दस्त नोंदणीची कामे प्रत्यक्ष छत्रपती संभाजीनगर येथे होत असल्याने स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. जेव्हा दस्त छत्रपती संभाजीनगरला होतो, तेव्हा गंगापूरला नोंदणी का केली जाते? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. वरिष्ठ अधिकारी यांनी या तातडीने लक्ष द्यावे, कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, आणि कामकाज पारदर्शक व सुरळीत करावे असे गंगापूर स्थानिक नागरिकांच्या भावना व्यक्त करताना सांगतात आहे.